वाकोद ता.जामनेर:
जिल्हा ग्रामविकास निधीतुन बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे बेकायदेशीर वाटप झाल्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान गाढवे(पाटील)आणि नवनियुक्त ग्रामपंचायत बॉडीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे केली होती.


सविस्तर वृत्त असे की ,येथील ग्रामपंचायत बॉडीने जिल्हा ग्रामविकास निधीतून अठ्ठेचाळीस लाख रुपये कर्ज घेऊन वीस गाळ्यांचे बांधकाम केले.गावातील गरजू लोकांना व्यवसाय करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, सोबतच ग्रुप ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे हा त्या मागील उद्देश होता. पण निवडणुकीत आपला पराभव झाला असताना आणि प्रशासक राजवट असताना या गाळ्यांचे वाटप करण्यात आले. गावातील धनवान आणि आपल्या मर्जीतील लोकांना त्याचे वाटप करण्यात आले. शिवाय कुठलीही अनामत रक्कम न घेता.नाममात्र दोनशे रुपये महिने प्रति गाळा इतके भाडे घेण्याचं करार करण्यात आला.नाममात्र भाड्यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न तर मिळणार नाहीच, शिवाय ग्रामपंचायतीला कर्जाच्या रकमेची परत फेडही करता येणार नाही. हे लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान गाढवे (पाटील) यांनी माहिती अधिकारात या व्यापारी संकुलासंदर्भातील कागदपत्रे मिळावी, अशी मागणी ग्रामपंचतीला केली, परंतु ग्रामपंचायतीकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याचे त्यांना कळवण्यात आले. तेव्हा त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे चौकशीची मागणी केली. तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत बॉडीनेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तेव्हा सदर प्रकरणाची चौकशी करून सात दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभागतर्फे गट विकास अधिकारी जामनेर यांना आदेश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *