पाडळसे येथील दोन युवकासह गावठी दारु व मोटार सायकल जप्त

Uncategorized

मनवेल ता यावल (वार्ताहर ) यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे सकाळी पथकासोबत गस्त करीत असताना बोरावल रस्त्यावर सकाळी ०८:३० वा. सरकारी वाहनाने जात असताना तेथे दोन मोटरसायकल रस्त्याचे बाजुला थांबवून एक मोठी गोणी एकमेंकाकडे अदलाबदल करत असल्याचे पथाकाने पाहून हटकले असता ते पळून जाऊ लागले, त्यांचा आम्ही पाठलाग करून एक मोटरसायकल बजाज डिस्कवर क्र. MH-19-AJ-3718 त्यावरील स्वार नामे-सचिन कडू सोनवणे वय.३३ व हितेंद्र कौतिक बावीस्कर वय.३३ दोघे रा. पाडळसे, ता.यावल यांना पकडले. त्यांचे ताब्यात मिळालेल्या गोणीत एक प्लास्टिक कॅन, त्यात गा.ह.भ.ची.तयार दारू ३५ लीटर मिळून आले. त्यांना सदरची दारु पुरविणारा इसम नामे- सुधाकर सपकाळे वय.४०, रा.भोलाणे, ता. जळगाव तालुका हा त्याची हिरोहोंडा स्प्लेंडर नंबर मिळून आला नाही, हा घटनास्थळावरून पळून गेला आहे. रितसर गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *