चाळीसगांव (राज देवरे) : चाळीसगांव तालुक्यातील डोणदिगर येथील रहिवासी जयेश व विवेक या दोघांनीही नवीन वर्षाच्या संकल्प करत निरोगी आयुष्य व प्रदूषण मुक्तीचा अनोखा संदेश देत कल्याण ते नाशिक आणि नाशिक ते कल्याण सायकल स्वारी केला आहे.

जयेश आणि विवेक या दोघांनी थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाचा आगळावेगळा संकल्प करत थर्टी फस्ट ला व्यसनाधीन होण्यापेक्षा निरोगी रहा आणि नवीन वर्षात प्रदूषण मुक्त कसं होऊ असा अनोखा संकल्प मनाशी बाळगत कल्याण येथून सुरुवात करत 140 किलोमीटर अंतर कापत नाशिक येथे येऊन परत नाशिक हुन कल्याण 140 किलोमीटर असे 280 किलोमीटर सायकल स्वारी करत पूर्ण केला. नवीन वर्षात अनेक जण अनेक संकल्प करत असतात मात्र असे संकल्प कमीत कमी बघायला मिळतात स्वतःविषयी आहेत पण समाजाविषयी व समाजात जनजागृती निर्माण व्हावी यासाठीही संकल्प केला आहे. असे अनेक उदाहरण बघायला मिळतात पण जयेश आणि त्याच्या मित्राने हा संकल्प सर्वांना कौतुकास्पद व मित्र परिवाराला अभिमानास्पद वाटणे योग्य आहे.

जयेश आणि विवेक या दोघांचे महाराज युवा मंच ठाणे अध्यक्ष भैय्यासाहेब देवरे, उपाध्यक्ष श्यामभाऊ नरहरे, सचिव रोहन कालेकर, गणेशजी शेलार, सागरजी भोसले, आकाश सावरे, गणेश भिसे, सागर आगोणे, सुरज लोखंडे, अभिजीत पाटील, अरविंद सावरे, सोनू विश्वकर्मा, शुभम जाधव यांनी या संकल्पाचे कौतुक केले आहे.

थर्टी फर्स्ट ला अनेक पार्टी, मौजमस्ती व धिंगाणा अनेक ठिकाणी बघायला मिळतात पण नवतरुण याकडे आकर्षिले जातात त्यातून तरुण-तरुणी व्यसनाधीन झालेली बघायला मिळतात वायफळ खर्च न करता आपण निरोगी आयुष्य जगू शकतो असही पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्यामुळे प्रदूषण ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे मोठमोठ्या संघटना यावर काम करत आहे आपण समाजासाठी काहीतरी देनं लागतो याकरिता कुठेतरी आपण प्रदूषण मुक्त विरित वाहन किंवा सायकल चालवून प्रदूषण कसं कमी करता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे असे या दोघी मित्रांचा एकत्रित सुर होता.

” पुढेही शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीसाठी सायकल स्वारी करणारा आहे .”
– जयेश अहिरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *