धानोरा ता.चोपडा -(वार्ताहर) ; आज गुरुवार रोजी दुपारी १ वाजता धानोरा सह परिसरातील मोजक्या शेतकऱ्यांनी कोरोना नियम पाळत विविध मागण्यांसाठी अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. शेतकरी विविध प्रकारचे संकटांनी मेटाकुटीला आला आहे.असंख्य संकटं डोक्यावर असतांना विज वितरण कंपनीकडून मात्र विजकनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू आहे. ही विज तोडणी तात्काळ थांबवावी, कांद्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन हमी भाव द्यावा, कापसाचा हमीभाव वाढवून दहा हजार मिळावा,
केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळावा, शेतीसाठी आठ तासांऐवजी किमान १२ तास तरी विजपुरवठा व्हावा व मिळणाऱ्या विजेप्रमाणेच बिलं आकाराणी करावी अशा विविध मागण्यांसाठी धानोरा येथे अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर असलेल्या जळगाव चौफुलीवर संतोष सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी कोरानाचे सर्व‌ नियम पाळून मोजक्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *