थेरोळे शिवारात तडसाने फस्त केली गाय

रावेर

रावेर : थेरोळे ता रावेर शिवारमध्ये तडसने एक गाय फस्त केल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुकयातील थेरोळा शेत शिवाराच्या एका शेतात असलेल्या गायवर तडसाने हल्ला चढवत ठार मारली आहे. हमयत गायीला व पगमार्ग बघुन ग्रामस्थांमध्ये वाघाने मारल्याची वार्ता पसरली होती. परंतु घटनास्थळी वनपाल अतुल तायडे गेल्यावर मयत गायी व पगमार्ग बघुन तो वाघ नसुन तडस असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळा असल्याने पाण्याच्या शोधात हिंस्र प्राणी गावांकडे येत असल्याचे वनपाल यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तडसाच्या शोधार्थ संपुर्ण शेत व आजू-बाजूचा परिसर शोधून काढला परंतु तडस कुठेही आढळून आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *