मुक्ताईनगर प्रतिनिधी,,, कैलास कोळी

मुक्ताईनगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यात वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले की संपूर्ण राज्यभरात आमचे नेते राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर तालुक्यात नव्हे तर खानदेशामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद काय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी संघटना काय करू शकते अशा विविध विषयांवर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यात म्हणाले की केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे.
जळगाव जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खूप मोठी ताकद करणार असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या ठिकाणी व्यक्त केले आहे.खांदेशामध्ये केळी पीक ,मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि त्या मध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांची खूप मोठी लूट होत असल्याचेही या वेळी माझ्या निदर्शनामध्ये आलेले आहेत आता या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात पुर्ण जिल्हा पिंजून काढून गावागावांमध्ये बैठका घेऊन जिल्हा भरातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम आता स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी व्यक्त केले आहे तसेच पत्रकार दिनानिमित्त मुक्ताईनगर तालुका पत्रकार बांधवांना भव्य सत्कार सोहळा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे ,बुलडाणा जिल्हाध्यक्ष अमोल राऊत ,उत्तम जुमळे ,सचिन पाटील ,सुरेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *