read-jalgaon

जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आतापर्यंत 53 लाख 65 हजार रुपयांची मदत

इंडिया जगाच्या पाठीवर महाराष्ट्र

जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांनी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत केली. देणगी देणाऱ्या संस्था आणि त्यांच्याकडून प्राप्त रकमा पुढील प्रमाणे..

राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.कासोदा ता.एरंडोल रक्कम रुपये 2 लाख 11 हजार 111, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सावदा, ता. रावेर रक्कम रुपये 21 हजार, सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी संस्था मर्या.रावेर रक्कम रुपये 11 हजार, नायगाव विविध कार्य.सेवा सह.संस्था मर्या.नायगाव, ता.यावल रक्कम रुपये 5 हजार, श्री. संतसेना महाराज नागरी सह.पतसंस्था,मर्या. भडगाव रक्कम रुपये 5 हजार, भडगाव तालुका सरकारी व निमसरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था,मर्या.भडगाव रक्कम रुपये 5 हजार, सावित्रीबाई फुले नागरी सह. पतसंस्था,मर्या. भडगाव, ता. भडगाव रक्कम रुपये 1 हजार 500, आबासो. दत्ता पवार नागरी बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.भडगाव रक्कम रुपये 1 हजार 100, कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील शिक्षण संस्थेतील नोकरांची सह.पतसंस्था मर्या. भडगाव रक्कम रुपये 3 हजार 11, जयदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.भडगाव रक्कम रुपये 2 हजार 100, दादासो. एस के पाटील नागरी पतसंस्था मर्या.जळगाव 5 हजार यांनी मदतीचे धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहेत. याप्रमाणे जिल्ह्यातून विविध संस्थांकडून आतापर्यंत एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *