जळगावात 20 लाखांच्या कार सह 37 हजारांची दारू जप्त…

क्राईम

जळगाव एम आय डी सी पोलिसांची कारवाई

जळगाव – शहरातील इच्छा देवी चौकातील पोलीस चौकीजवळ पोलिसांनी संशयावरून झडती घेतल्यानंतर एका कार मधून विनापरवाना वाहतूक होत असलेली 37 हजार रुपये किंमतीची विदेशी दारू आणि कार जप्त केली. कार चालकाला जागेवर पंचनामा केल्यांनतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या आदेशावरून
पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पो हे कॉ विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, निलेश पाटील, सचिन पाटील हे खाजगी वाहनातून गस्त घालत असताना त्यांना तोंडाला मास्क न लावता वाहन चालवणारा कारचालक आढळला म्हणून त्यांनी त्याला हटकले आणि नाव गावाची विचारणा केली. त्यांनतर संशयावरून कार ची झडती घेतल्यावर कारच्या डिक्कीतून विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचे आणि बिअर च्या बाटल्यांचे खोके सापडले. त्यांनतर पोलिसांनी परिसरातील दोन पंचांना बोलावून कार आणि मुद्देमालाचा पंचनामा केला पंचनामा झाल्यावर नमुना तपासणीसाठी काही बाटल्या सील केल्यावर ताब्यात घेतल्या.
पोलिसांनी सय्यद मुन्ना सय्यद बाबूमन्नू (वय55, राहणार / आर वाय पार्क जळगाव) याला अटक केली आहे. त्या कारचालकाने दिलेल्या माहितीनुसार तो या सगळ्या मद्याच्या बाटल्या त्याचा मालक व आदर्शनगरातील रहिवाशी मुफद्दर अलिहुसेन अमरेलीवाला यांच्या साठी खरेदी करून घेऊन जात होता. पो हे कों विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 188,270 नुसार या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यात जप्त केलेल्या कार चा क्रमांक एम एच 19 सी व्ही 10 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *