जळगावात लक्झरीची दुचाकीला धडक ; एक ठार

क्राईम जळगाव

जळगाव : येथील कालींका माता मंदिराजवळ आज सकाळी लक्झरीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला आहे.

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कालींका माता मंदिराजवळ दुचाकी क्रमांक एमएच १९, बी.यु.७७७७ ही जळगाव शहराकडे येत होती. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी लक्झरी क्रमांक एम.एच. ०४ जी.८८०५ ने दुचाकी जोरदार धडक दिली. या अपघातात मोटार सायकल स्वार लक्झरीच्या चाकात येऊन चिरडला गेला. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मयताची ओळख पटू शकली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *