जळगावात रस्त्यावरील कार्यवाहीपासून खान दूर…

Politicalकट्टा जळगाव

जळगाव : शहरात फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी सुरक्षित अंतर, तोंडावर मास्क आणि हातात ग्लोजच्या अटीचे पालन करावे. सध्या सर्वच बाजुंनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास रस्त्यावर फळे व भाजीपाला विक्री करताना इतर त्रास होणार नाही आशी ग्वाही महापौर भारतीताई सोनवणे, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आज दिली. याबरोबरच अतिक्रमण विभागाचे खान यांना कार्यवाहीसाठी रस्त्यावर न पाठविण्याची सूचनाही मान्य केली. खान हे जूनमध्ये निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्या खाते बदलाचा विषय टळला.

शहरात काही शेतकरी रस्त्यावर थेट फळे व भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यांच्यापैकी काही जणांवर अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उचलला. थेट मंत्र्यांपर्यंत तक्रार झाली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही मनपाच्या संबंधितास सूचना दिल्या. त्यानंतरही शेतकऱ्यावरील कारवाई थांबवून शेतमाल (टरबूज) वेळीच परत केले गेले नाही. हा विषय सोशल मीडियात आल्यानंतर महापौर भारतीताई सोनवणे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी बैठक घेतली.

बैठकीस उपायुक्त वाहुळे, खान, अभिषेक पाटील, दीपक परदेशी, कुणाल पवार, स्वनील नेमाडे, सुशील नवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी अडचणीत आहे, त्यांना त्रास देऊ नका असा आग्रह पाटील यांनी केला. कायदे सर्वच महत्त्वाचे आहे. पण त्यामुळे शांतता धोक्यात आणणारा विषय टाळा असे नवाल म्हणाले. शेतकऱ्यांवर अतिक्रमण हटावची कारवाई केलेली नाही. पण कोराना प्रतिबंध संदर्भातील अटींचे पालन त्यांनी करावे. मनपा पथक अगोदर सूचना देते. ऐकले नाही तर कारवाई करते असे वाहुळे म्हणाले. पाटील यांनी अतिक्रमण हटाव कर्मचाऱ्यांची अरेरावी व जप्त माल घरी नेत असल्याची तक्रार केली. परदेशी यांनी शेतकऱ्यांना चौकात जागा द्या, आम्ही संस्था म्हणून मदत करु असे सांगितले.

शेतकऱ्यांची स्थिती डोळ्यांत पाणी आणणारी आहे. शेतात जे टाकले ते पुरेसे पिकत नाही. जे काही हातात येते त्याला भाव नाही. त्यामुळे तूर्त कारवाई शिथिल व अगोदर सूचना देऊन करावी अशी समंजस सूचना भारतीताईंनी केली. सर्वांनी खान यांच्या विषयी तक्रार करुन त्यांना कार्यालयात ठेवा अशी विनंती केली. अखेर दोन निर्णय झाले. शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजन करायला लावाव्यात. खान यांना कार्यवाहीसाठी रस्त्यावर पाठवू नये, हे निर्णय झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *