जळगावात महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू..

क्राईम

जळगाव : शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर घरात जात असतांना सुरू असलेल्या कुलरला धक्का लागल्याने ३२ वर्षीय दिव्यांग विवाहितेचा मृत्यू झाला. कुलरमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने ही दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे हनुमान नगर परिसरात शोक व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता ज्ञानेश्वर कुमावत वय ३२ रा. हनुमान नगर, वाघ नगर परिसर ह्या रात्री १० वाजेच्या सुमारास शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर विद्युत प्रवाह उतरेल्या पत्र्याच्या कुलारला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर विवाहितेस एक मुलगी व एक मुलगा, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *