गिरीश महाजन माजी मंत्री असूनही चुकीच्या माहितीवर बोलतात : मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला

Politicalकट्टा

भाजपचे नेते गिरीश महाजन माजी मंत्री आहेत. मात्र, ते चुकीच्या माहितीवर बोलतात. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून जळगाव जिल्ह्यात “कोरोना’ रुग्णांसाठी होणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली असती, तर त्यांना सर्वच माहीत झाले असते, असा टोला शिवसेना उपनेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

भाजचे नेते व माजी मंत्री महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात “कोरोना’ रुग्णांसाठी केवळ चार व्हेंटिलेटर आहेत. अधिक व्हेंटिलेटर तत्काळ खरेदी करावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपण पत्र दिले. परंतु त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केला. महाजन यांच्या या आरोपाला मंत्री पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

मंत्री पाटील म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात “कोरोना’ रुग्णांची संख्या वाढू नये तसेच रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी शासन उपायोजना करीत आहे. आतापर्यंत फक्त “कोरोना’ रुग्णांसाठी तब्बल सात कोटी रुपये मंजूर केले. यात चोपडा, रावेर, धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी तीन कोटी 78 लाख, आपत्ती यंत्रणेतून दोन कोटी; तर व्हेंटिलेटर रूम उभारणीसाठी आपत्ती व्यवस्थापनातून दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *