गर्दी बनू शकते कोरोनाची वर्दी. जामनेरात सोशल डिस्टेंसिंगचा उडतोय फज्जा…

जामनेर

संचारबंदी लागू असताना देखील गुरुवारी नागरिकांची एकच गर्दी

जामनेर (ईश्वर चोरडिया) : देशात व राज्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉक डाऊन आणि संचारबंदी कलम लागू केले आहे तर जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदी कलम लागू केल्यावर देखील जामनेर शहरात गांधी चौकात बाजारात गर्दी दिसून येत होती.

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोंना रुग्ण वाढत असून देखील मात्र जामनेर शहरात लोकांची बिनधास्त पणे वर्दळ दिसून येत असल्याने सुज्ञ नागरिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जामनेर शहरातील ही गर्दी कोरोनची वर्दी बनू नये म्हणजे झाले.

बाजार बंद करण्यात आले असून देखील शहरात इतकी गर्दी जमा होत असल्याने प्रशासनाचे दुर्लक्ष जाणून बुजून तर होत नाही ना अशी शंका नागरिकात व्यक्त केली जात आहे.

यापुढे तरी देखील प्रशासनाने याबाबत गांभीर्य ओळखून शहरात अशी गर्दी होऊ नये अशी चर्चा देखील नागरिक करतांना दिसून येत होते.

जळगाव जिल्ह्यात रोज नवीन रुग्ण आढळून येत असून जामनेर कर जनतेने तरी चाहूल ओळखून विनाकारण घरा बाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *