कौटूंबिक वादातून पोलीस उपनिरीक्षकांने झाडली पत्नीवर गोळी

क्राईम धरणगाव

जळगाव – कौटूंबिक वादातून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकांने जळगावच्या माहेरवाशीन असलेल्या आपल्या पत्नीवर गोळी झाडून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे घडली आहे.

घरात प्रत्यक्षदर्शी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची सात वर्षीय मुलगी भार्गवी हिने जळगावातील मामा गणेश सपके यास मोबाईलवरुन पप्पाने मम्मीच्या डोक्यात बंदुकीने गोळी मारल्याची माहिती दिली.

याबाबत माहिती अशी की, कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज बाबूलाल शिरसाठ (वय 34, मूळ राहणार मुसळी, ता. धरणगाव) याने जळगावातील लक्ष्मीनगरातील माहेरवाशिण असलेली पत्नी संगीता हिच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली.

घरात प्रत्यक्षदर्शी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची सात वर्षीय मुलगी भार्गवी हिने जळगावातील मामा गणेश सपके यास मोबाईलवरुन संगळा घटनाक्रम सांगितला. यात संगीता धनराज शिरसाठ (वय 28) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुसळीचा पोलीस उपनिरिक्षक मुलचेरा येथे कार्यरत
शहरातील लक्ष्मीनगरात राहणाऱ्या संगिता सपके यांचा सात वर्षापूर्वी विवाह धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील धनराज शिरसाठ यांच्याशी झाला. त्यांना ७ वर्षाची मुलगी भार्गवी व ४ वर्षाचा मुलगा शिवा, अशी दोन मुले आहेत.

धनराज शिरसाठ हे मुंबई येथे पोलीस हवालदार होते. २०१७ मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा पास केली. पोलीस उपनिरीक्षकपदी पहिलीच नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात मिळाली.

वर्षभरापासून धनराज व संगीता यांच्यात वाद सुरु आहे. याबद्दल संगीता हिने जळगावात राहत असलेल्या आपल्या वडिलांना माहिती दिली. त्यानुसार वडिलांनी धनराज याच्या आई व वडिलांना मुलगा धनराज याची समजूत काढण्याचे सांगितले होते.

याप्रमाणे समजूत काढण्यासाठी लॉकडाऊनपूर्वी धनराज याचे वडील बाबूलाल नामदेव शिरसाठ व आई सुशिला शिरसाठ हे मुलचेरा येथे गेले होते. या दरम्यान गुरुवारी 7 मे रोजी, दुपारी धनराज व पत्नी संगीता यांच्यात भांडण झाले. या भांडणातून धनराज याने त्याच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्वरने पत्नी संगीतावर गोळीबार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *