केळीला वाढत्या उष्णतामानाचा बसतोय फटका

यावल रावेर

चिनावल (वार्ताहर) : गेल्या ८ ते १० दिवसापासून चिनावलसह संपूर्ण रावेर यावल तसेच जळगाव जिल्हा भरात दिवसेंदिवस उष्णतामान वाढत आहे. यामुळे जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या केळी वर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

सद्यस्थितीत सर्वत्र केळी कापणी मोठ्या प्रमाणावर आहे तर काही केळी खोडे अजून ही निसवणी वर आहे व या केळी वर उत्पादकांचे भवितव्य अवलंबून आहे. आधीच कोरोना मुळे केळी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागली आहे त्यातच आजमितीस एप्रिल व सदर यांचे ‘ मे ‘ हिट चे सरासरी ४२ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान रहात असल्यामुळे केळी चे पाने ,पोगा ,खोड करपू लागले दिसत आहे.

आजच्या परिस्थितीत केळी ला कितीही पाणी दिले तरी मोठ्या उष्णतामान ने तात्काळ शोषले जाते आहे. त्त्यातच नविन केळी लागवड व अन्य बागायती पिकांसाठी ही पणी द्यावे लागत असल्याने कापणी वर असलेल्या केळी बागा वाचवणे जिकिरीचे झाले आहे.

आजच्या दिवसातील तापमानापेक्षा ही अजून येणाऱ्या पुढील काळात उष्णता मान वाढण्याची शक्यता जास्त आहे. या मुळे केळी उत्पादक आजपासून नच केळी पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

केळी घडाना घोंगडी च्या साहाय्याने झाकणे, केळी बागांच्या आजू बाजूने, कडबा, लावणे, काही शेतकरी नेट व साड्या लावून केळी ला मोठ्या उष्णतामाना पासून वाचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत या पुढील ‘ मे ‘ व ‘ जून ‘ हिट चां काळ यावयाचा बाकी आहे या मुळे केळी उत्पादक चिंतेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *