किराणा दुकानासह घरावर दगडफेक मालकाच्या भावावर तलवारीने वार

क्राईम धुळे माझं खान्देश

नातेवाईकांना मारहाण करत नऊ हल्लेखोर फरार

धुळे : लॉक डाऊन असताना देवपूरातील नकाणे रोडवरील साईबाबा नगरातील एका किराणा दुकानदाराच्या घरावर आठ ते नऊ जणांनी दगडफेक केली तलवारी ने वार करत दुकानदाराच्या लहान भावाला जखमी केले. नातेवाईकांना मारहाण केली. दुकानदाराला जीवेठार मारु असे धमाकावून सगळे घटनास्थळाहुन पसार झाले.

देवपूरातील किराणा दुकानदार कल्पेश तुकाराम गवळी हा दुकान सुरू ठेवतो. यामुळे अन्य लोकांना त्रास होईल हे कारण पुढे करत दुकान सुरू करु नकोस असे दुकान मालकाला धमकावून नऊ जणांच्या टोळक्याने रात्री घरावर दगडफेक केली घरातील नातेवाईकांना तलवार, लोखंडी रॉड, लाठी, काठ्यांनी डोक्यात वार करुन जखमी केले. या दुकानदाराला जीवेठार मारण्याची धमकी दिली.

रात्रीच्या वेळी झालेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेखर तुकाराम गवळी याला मारुन टाकण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर व हातावर तलवारीने संतोष दौलत अंजीखान याने त्याला जबर जखमी केले. सोबत आलेले अभिषेक घुगरे, भटु घटी, गणेश घटी, भटू घुंगरे, भुषण गवळी, विक्की घुगरे, भटू घुगरे, राम अंजीखान यांनी दगड, विटा घेऊन घरावर दगडफेक केली. तलवारी ने वार करून शेखर गवळीला जखमी केले. त्याच्या साथीदारांनी वडिल, व चुलतभाऊ आकाश, मेव्हणे, भाविक गवळी यांना मारहाण केली.

दगडफेक करून मारुन टाकण्याची धमकी देत सगळे जण घटनास्थळाहुन पसार झाले.
जखमींना नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती पोलिसांनी कळाली त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळत भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला. फरार झालेल्या आरोपीचा तपास सुरू केला.

या प्रकरणी कल्पेश गवळी यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठून दगडफेक व मारहाण करणाऱ्या नऊ जणांची नावे सांगून लेखी तक्रार दाखल केली आहे.
त्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *