चोपडा ; चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी असलेले एसटी कर्मचारी वाहक राजेंद्र खंडु वाणी (55) यांना काल (सोमवारी) कामावर येण्यासंदर्भातची कारणे दाखवा नोटीस घरपोच पोस्टाने मिळाल्यानंतर ती नोटीस वाचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

चोपडा हरताळकर हॉस्पिटलमधून वाणी यांना जळगाव घेऊन जात असताना रस्त्यातच दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या सर्व प्रकरणाबाबत चोपडा आगारातील वाहक व चालक यांनी मृत आरके वाणी यांना न्याय मिळावा. त्यांच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून लेखी आश्‍वासन आपण द्यावे, असा आग्रह कर्मचाऱ्यांनी धरून थेट दोन तास चोपडा आगारातील आगारप्रमुख संदेश क्षीरसागर यांना घेराव घातला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *