उन्हाच्या उंबरयाशी चांदवा

ब्लॉगर्स कट्टा

लग्नानंतर या दिवसात निवांत अणि शुद्ध असा सुरेख अनुभव घेत आम्ही दोघेच पुण्याला. तस सगळेच जण मस्त मज्जा करा, काळजी घ्या असेच काहीसे बोलायचे पण तेव्हा वाटायचं काय मजा ही तर सजा आहे…. पण खरच खूप मस्त वाटलं जेव्हा तो दिवस उजाडला कारण त्याने काहीतरी नवीन अगदी वेगळे केल़े होते.

आज मी अणि तो दोघेही घरून काम करत होतो, त्याचा कामाचा वेळ म्हणजे सकाळी ७.३० अणि मी ९.३० वाजेपासून प्रशिक्षण देण्यास सुरूवात करायची . साडेनऊच्या आधी चहा न्याहारी करून, दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवणे हा जणू काही दैनंदिनी चा एक भागच झाला होता. जेवणाची वेळ म्हणून एक तास मिळायचा, तसा स्वयंपाक करून गरमागरम जेवण करणे यात कसा वेळ जायचा कळायचे नाही.

पण रोज काहीतरी नवीन पदार्थ करण्याचा माझा अट्टाहास असायचा. तसे आम्ही दोघंही खवय्ये…अणि म्हणुनच जिभेचे चोचले पुरवायला दोघेही तेवढेच उत्साही.आज १०-१२ दिवस झाले होते लॉक डाऊन अमलात अणायलाला, पण आता रोज रोज नवनवीन पदार्थ सोबत घरकाम ही कराव लागायच…

तसं ऑफिस सुरू असताना काही वाटायच नाही कारण मावशी येउन भांडी  करून जायच्या, आता मात्र भांडी, झाड झुड, फरशी अणि बरेच काही करावे लागायचे , ही सगळी कृपा कोरोनाची. घरून काम करण्याच्या नवीन संकल्पना मुळे थोडा वेळ काम थोडा वेळ आराम न घरातील खूप काही काम असा संगम घडवून आणला होता पण तो तितकाच सुंदर वाटायचा…कारण तसा खास नाही, पण नवीन assignment मिळाली म्हणून आनंदाने, उत्साहाने तो पुर्ण करण्याची जिद्द मनात येत असे.

असो… आज तसा शनिवार म्हणजे नवरोबाचा सुट्टीचा दिवस, पण माझा कामाचा दिवस… अणि त्यामध्ये माझं शिक्षण, मी एमबीए ला शिकते … तसा म्हणजे आवड माझी न इच्छा आई वडिलांची.  यामध्ये त्याने दिलेल्या सोबतीने मी विद्यार्थिनी , स्वावलंबी अणि कार्यरत स्त्री , बायको अणि गृहिणी हे सगळे पात्र  प्रत्यक्षात अनुभवत होते. जसे प्रत्येक वेळी या सगळ्यांचा समतोल साधून मी करायचे तसेच आता ही करायचे आहे असा मानस ठेवून कार्य मार्गी लागायचे.

मात्र आज मला सकाळी उशिरा जाग आली आणि लगेच झूम अॅपप  वर येऊन लेक्चर ला हजेरी लावायची अन्‌ त्यानंतर ऑफिस चा काम न न बरच काही . या सगळ्यात हातात चहा, नाश्ता  करून खाऊ घालणारा माझा नवरा . हाच तो दिवस ज्या दिवशी त्याने  माझा आवडता चहा अणि ब्रेड जाम  मला माझ्या स्टाइल मधे आणून दिला. एवढेच नाही तर दुपारच्या जेवणात भाजी करणे , भांडी पुसून ठेवणे अणि बरेच काम केले. आज खर तर माहेरी असल्या सारखे वाटले कारण इतक सगळ आपल्या हातात मिळत होत अणि तेही पुण्यात.. विचार पण नव्हता केला …पण इतक्यात तो थांबला नाही, दुपारची  कॉल्ड कॉफी अणि खाखरा सुद्धा ट्रे मध्ये सजवून आणला. खरच तो खास क्षण होता माझ्यासाठी, सदैव स्मरणात राहावा असा. 

दिवसाअखेर मी त्याला प्रश्न केला आज काही विशेष आहे का,??? त्यावर तो म्हटला, “तु न मी दोघेही  वर्क फ्रॉम होम करत आहोत पण रोज तु खुप काम करत आहेस, जस आपल्या दोघांना WFH आहे तसाच घरातील कामाचेही विभाजन झाले पाहिजे म्हणून मी आज थोडे फार घर काम केले. तसाही सगळे काम तुझा एकटीवरच पडले आहे तर मी काही केले तर काय तुला नक्कीच माझी मदत होईल.. हो ना?? “खर तर असे बोलणे फक्त फेसबुक अणि वाट्सअप वर मेसेज मधेच दिसत असत …… पण मला आज ते अनुभवता आले..

– रश्मी चेतन (पुणे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *