अवैध वाहतूक सोशल डिस्टन्सचे वाजले बारा…प्रशासन मात्र गप्प.!

जळगाव


अंकित कासार : जळगांव येथील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ जवळपास मालवाहतूक गाड्या मध्ये भरून माणस बाहेर च्या राज्यात नेण्यात आले.

या मुळे पुन्हा एकदा प्रशासन चा भोंगळ कारभार दिसून आलाय याच भागा नजीक सालार नगर आहे.

या ठिकाणी कोरोना चा रुग्ण सापडला होता त्याच प्रमाणे अनेक मजूर लोक देखील या भागात रहात असल्याने मोठ्या प्रमाणावर दाट वस्ती देखील आहे.

जिल्ह्या कोरोनाच्या रुग्ण संख्या शतका च्या पुढे गेली असताना अश्या प्रकारे वाहतूक करणे आणि संपर्कात येणे हे धोक्याचे आहे.

सदर परिसरात रहाणाऱ्या अन्य नागरीकांनी पोलीस प्रशासन याना ही बाब निदर्शनास आणून दिली.असता त्यांनी देखील कारवाई न करता या कडे काना डोळा केला या मुळे पुन्हा एकदा प्रशासना चा भोंगळ कारभार समोर आला आहे. तरी ही बाब गंभीर असून अशी वाहतूक करणाऱ्या व्यक्ती वर लवकरात लवकर कारवाई करावी अशी तेथील नागरिक वर्गाने विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *