यावल शहरातील ३२ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू

अपघात क्राईम तापी यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी ::>शहरातील शिवाजी नगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी एका ३२ वर्षीय तरुणाचा तापी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. रामधन पुंजो बेलदार असे या मृत तरुणाचे नाव असून तो बुधवारी भालशिव गावाजवळील तापी नदीपात्रात बुडून बेपत्ता झाला होता. तर गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला.

भालशिव जवळ तापी नदीपात्रात बुधवारी उत्तर कार्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात यावल शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टी भागातील रहिवासी रामधन पुंजो बेलदार हा तरूण गेला होता.

नदी पात्राजवळून जात असताना त्याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. बुधवारी सायंकाळपर्यंत शोध घेऊनही त्याचा तपास लागू शकला नव्हता.

त्यामुळे गुरुवारी सकाळपासून पुन्हा त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात अाले. मृत रामधन बेलदार याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.