यावल शहरासह तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

आत्महत्या क्राईम यावल

यावल शहरात ३४ वर्षीय तरुणाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट >> शिवाजी नगर भागातील ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पावणे दोन वाजेला ही घटना उघडकीस आली. गजानन नारायण कोल्हे असे मृत तरुणाचे नाव आहे. गजाननचे लहान भाऊ विजय नारायण कोल्हे यांनी खबर दिली. त्यानुसार त्यांचा मोठा भाऊ गजानन हा त्यांच्या घराशेजारी राहतो. शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. गजानन याने आत्महत्या का केली त्याचे कारण मात्र समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

आडगावात ५५ वर्षीय प्रौढाने घेतला गळफास, सकाळी घटना उघडकीस >> यावल तालुक्यातील आडगाव येथे ५५ वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. रामचंद्र उर्फ देवसिंग मंगल भिलाला असे मृताचे नाव आहे. दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. घेसराम दवेसिंग बारेला रा. आडगाव यांनी या प्रकरणी खबर दिली. त्या नुसार आडगाव येथील रहिवासी रामचंद्र उर्फ देवसिंग मंगल भिलाला हा शुक्रवारी रात्री त्याच्या राहत्या घरात झोपला होता. सकाळी सहा वाजेला त्यास झोपेतून जागे करण्यास गेले असता तो घरात गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करत आहे.