| यावल प्रतिनिधी |>> सामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवणे व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच भाजपचे काम आहे. प्रशासनाच्या माध्यमातून असो की वैयक्तिकरित्या आपण गरजूंना मदत केली पाहिजे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. वड्री धरण परिसरातील आदिवासी पाड्यावर दिवाळीनिमित्त कपडे, फराळ व मिठाई वाटप करताना ते बोलत होते.

शुक्रवारी वड्री धरण परिसर, सातपुड्यातील दोन आदिवासी वस्त्यांवर भाजपने कपडे, फराळ, मिठाई वाटप केले. यात दोन्ही वस्त्यांवर १०० पेक्षा जास्त कुटुंबातील महिलांना साडी, बालकांना ड्रेस, मिठाईचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. जि.प.सदस्या सविता भालेराव, ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, वड्रीचे ललित चौधरी, लहू पाटील, अतुल भालेराव, योगेश साळूके, अजय भालेराव, व्यंकटेश बारी, रितेश बारी, तुषार चौधरी, भूषण फेगडे, देविदास बारेला, मनोज बारी, स्नेहल फिरके आदी उपस्थित होते.