तब्बल दीड महिन्यानंतर दुचाकी अपघात प्रकरणी चारचाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल

अपघात क्राईम यावल

यावल प्रतिनिधी >> यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघात प्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर चारचाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला होता.

चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ ८ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीद्वारे भीमसिंग पंडीत पाटील, रा. विरावली येत होते. त्याचवेळी समोरून डॉ.सागर कडू वारके हे चारचाकी वाहनांवरून समोरून आले.

दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात भीमसिंग पाटील जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले होते.

या प्रकरणी येथील पोलिसांनी तपास करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या डॉ.सागर वारके यांच्याविरुद्ध हवालदार मेहबूब तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तडवी करत आहे.