यावल पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचा बट्याबोळ

Politicalकट्टा कट्टा यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी ::> येथील तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातुन स्वच्छता अभियानाचा बट्याबोळया झाला. शासनाच्या मिळालेल्या अनुदानाचा मोठया प्रमाणावर दुरूपयोग करण्यात आल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) चे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे.

संपुर्ण देशासह राज्यात स्वच्छता अभियानास यशस्वी करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांची निधीही गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधणीसाठी मिळत असतात मात्र तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात ही स्वच्छता योजना राबवितांना सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसुन पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी, ठेकेदार आणि शाखा अभियंता यांनी तालुक्यात विविध ग्रामपंचायत च्या परिसरात गाव पातळीवर ठीकठीकाणी सार्वजनिक शौचालयांची थातुर मातुर व अपुर्ण कामे करून ती कागदोपत्री पुर्ण दाखवुन पुर्ण बिले काढण्यात आली असल्याची तक्रारीत म्हटले असुन, या योजनेची काही कामांची आदेश मिळण्याआधी काही अधिकारी यांनी आपल्या मर्जीतील मते दाखल करून कामे सुरू केली आहे.

दरम्यान अशा कामांच्या मान्यता मिळवुन घेण्यासाठी शाखा अभियंता पासुन तर जिल्हा परिषदच्या वरिष्ठापर्यंत आर्थिक देवाण घेवाण करून खोटी बिले तयार करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावल तालुक्यातीत मांगीकरंजी, लिघुरी , वढोदा, अट्रावल, भालोद, मायसांगवी, निमगाव, डोंगर कठोरा, हंबर्डी, बोरखेडा बु॥ आणि खुर्द चिखली बु॥, चिखली खु॥ , मनवेल, बोरावल, टाकरखेडा, थोरगव्हाण व चुंचाळे या ग्रामपंचायती मधील कार्यक्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची कामे अपुर्ण अवस्थेत सोडलेली असुन, कामांची बिले मात्र ठेकेदारांनी काढुन घेतलेली असुन, अशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदारा कडुन बिले वसुल करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली असुन , यावल तालुक्यातील ग्राम पंचायत आणि ठेकेदार यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त झालेल्या निधीचा देखील गैरवापर झालेला असुन, शासनाच्या निधीसह २०% ग्रामपंचायत निधी मध्येही बोगस बिले दाखवुन मोठया प्रमाणावर आर्थीक घोटाळे केलेले या सर्व भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून संबंधीतांवर योग्य प्रकारे कारवाई न झाल्यास रिपाईच्या माध्यमातुन तिव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा ईशारा रिपाईचे अशोक तायडे, जिल्हा रोजगार आघाडीचे युवराज सोनवणे, रिपाईचे युवा शाखा अध्यक्ष संजय तायडे , रिपाईचे तालुका उपाध्यक्ष भिमराव गजरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.