यावल ::> येथील भुसावळ रस्त्यावर असलेल्या शिव भोजन केंद्रावर काही अज्ञात व्यक्तींनी भांडण करून त्या ठिकाणी सामानाची नासधूस केली. तर केंद्र संचालक असलेल्य महिलेस शिवीगाळही केली. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.
भुसावळ रस्त्यावर असलेल्या शिव भोजन केंद्राच्या संचालिका प्रमिला भिल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार शुक्रवारी त्यांच्या शिव भोजन केंद्रावर एमएच १९ सीव्ही ०९३७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून काही जण आले व दारूच्या नशेत असलेल्या या अज्ञातांनी कोणतेही कारण नसताना केंद्रावर येऊन शिव भोजन संचालकांना शिवीगाळ केली. तसेच तेथेच सामानाची फेकाफेक केली. याबाबत संशयितांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिस तपास करत आहेत.