यावल गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार.
यावल प्रतिनिधी
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यातील मागासवर्गीय,दलित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळावे,याकरिता मातोश्री रमाई घरकुल निवास योजना सुरु करण्यात आलेली आहे व याचा बहुतांश कुटुंबांना देखील मिळालेला आहे.परंतु सध्या कोरोना विषाणूचा साम्राज्य असतांना ज्या नागरिकांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यातील बहुतांशी नागरिकांनी नवीन पक्के घरे बांधून घेण्यासाठी जुनी घरे तोडली.
- शासनाने त्या सर्व लाभार्थींना घरकुल निधीचा पहिला व दुसरा हफ्ता मिळाला व घराचे बांधकाम सुरू झाले परंतु आजपर्यंत कोणताही हफ्ता मिळालेला नाहीय जिल्हात अनेक ठिकाणी अशी समस्या आहे त्यामुळे त्यांचे घरांचे कामे देखील अपूर्ण आहेत व पावसाळा सुरू असल्याने या सर्व लाभार्थ्यांना परिवार उघड्यावर असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ज्यामुळे प्रसंगी अपूर्णावस्थेत असलेली बांधकाम पडून त्या ठिकाणी जीवित हानी देखील घडू शकते, तरी आपण वरील वृत्ताचा विचार करून वरिष्ठ पातळीवर आमची निवेदन रुपी मागणी पोहीचवावी व सर्व रमाई योजनेतील लाभार्थ्यना त्वरित निधी उपलब्ध करून घ्यावा हीच “भिम आर्मी” भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेद्वारे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
- तसेच मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास पूर्ण राज्यभर “भिम आर्मी” च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी भिम आर्मी जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका उपाध्यक्ष आकाश तायडे, तालुका सचिव प्रशांत तायडे, सहसचिव गौरव सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख भिमराव सावळे, राहुल जयकर,सचिन वानखेडे, पवन लोंढे, आकाश तायडे यांनी निवेदन यांच्या स्वाक्षऱ्या आहे.