आज यावल शहरात 5 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

यावल

यावल प्रतिनिधी >> शहरातील व्यासनगर मधील 3, फैजपुर रोडवरील व्यासनगर मधील 1, पांडुरंग सराफनगर मधील 1 ( दूध डेअरी चालक ) असे एकूण 5 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आज दुपारी आले आहेत.
यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी.बी. बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी आज दिनांक 17 रोजी एकूण 17 जणांची एंटीजन तपासणी केली त्यात वरील ठिकाणचे 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे यावल शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *