यावल ग्रामीण रुग्णालय

यावलला दोन दुचाकींची धडक, पाच गंभीर जखमी

अपघात किनगाव क्राईम यावल साकळी

यावल >> यावल–चोपडा रस्त्यावर गिरडगावजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये तर काहींना जळगावला हलवण्यात आले.

सोमवारी दुपारी दुचाकीने (क्रमांक एम. पी. ६८ एम. जी. २१३८) भवूकुमार बारेला (वय २५) व ओमप्रकाश कैलास बारेला (वय ४२ रा. खंडवा) हे चोपड्याकडे जात होते. तर समोरून दुचाकीने (क्रमांक एम. एच. १९ बी. पी. ८१०८) सचिन रमेश पावरा (वय २०, रा. वाघझिरा), श्रीराम भैय्या बारेला (वय ४०) व ज्योती तुफान बारेला (वय १४, रा.चांगतलाव, ता.चोपडा) येत होते.

गिरडगावजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात पाचही जण गंभीर जखमी झाले. कोळन्हावी येथील गोटू सोळुंके यांच्यासह नागरीकांनी जखमींना मदतीचा हात दिला. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरिचारीका शितल ढोंबरे, पिंटू बागुल, वाय. डी. चौधरी यांनी प्रथमोपचार केले.