यावल पोलिसांनी किनगावच्या चोराकडून 5 मोटारसायकली केल्या जप्त

क्राईम यावल

किनगाव प्रतिनिधी >> यावल पोलिसांनी किनगाव येथून एकाला व जळगाव शहरातील दुसर्‍या आरोपीला अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. ही कारवाई करताना पोलिसांनी या आरोपींकडून चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणार्‍या अन्य दोन आरोपींनाही अटक केली आहे. या आरोपींकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटाके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापु रोहोम यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, उमेश गिरीगोसावी, राजेंद्र पवार, मुरलीधर बारी यांचे पथक स्थापन करून त्यांच्याकडे तपास सोपवला होता.

या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांनी किनगाव येथील रेकॉर्डवरचा गुन्हेगार सागर काषली याला सापळा रचून अटक केली होती. कामधंदा न करता तो करीत असलेल्या पैशांच्या उधळपट्टीची चर्चा परिसरात होती. त्याच्या ताब्यातून नायगाव, आडगाव, डोणगाव व चुंचाळे येथून त्याने लपवलेल्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. तो मोटारसायकली चोरून जळगावातील त्याचा साथीदार व रथचौक, कोळीपेठेतील रहिवाशी आरोपी आकाश उर्फ धडकन सपकाळे याच्याकडे विक्रीसाठी सोपवत होता, अशी कबुली त्याने दिली आहे.

आकाश सपकाळे याला अटक केल्यावर या दोघांकडून चोरीच्या मोटारसायकली विकत घेणारे जळगावातील सुदर्शन मोरे ( मेहरूण), दीपक खांदे ( अयोध्यानगर ) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पो.नि. अरूण धनवडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *