यावल शहरात केळी उत्पादकाला २ लाख १५ हजारांचा व्यापाऱ्याने लावला चुना ; गुन्हा दाखल

क्राईम यावल

यावल प्रतिनिधी ::> शहरातील एका केळी उत्पादक शेतकर्‍याच्या शेतातून व्यापाऱ्याने २ लाख १५ हजार रुपयांची केळी खरेदी करून अद्यापही पैसे दिली नसल्याची तक्रार यावल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. व्यापार्‍याकडुन फसवणूक झाली असून त्याने दिलेले धनादेश न वटल्याने यावल पोलीसांनी संबंधित व्यापार्‍याच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

यावल शहरातील महाजन गल्लीत राहणारे केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे (वय ४५ ) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , लिलाधर प्रल्हाद पाटील ( रा. सिंधीपुरा गेट जवळ बहादरपुर तालुका जिल्हा बर्‍हाणपूर) यांनी २ डिसेंबर २०१८ ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत फिर्यादी किशोर देवराम राणे यांच्या शेतातील १८१ क्विंटल ५५ किलो वजनाची केळी किमत २ लाख १५ हजार रुपयांची खरेदी करून त्याच्या मोबदल्यात धनादेश दिले होते. मात्र हे धनादेश बँकेत न वटल्याने फिर्यादीने लिलाधर पाटील यास केळी मालाचे पैसे मागीतले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना धमकावले.

या प्रकारानंतर केळी उत्पादक शेतकरी किशोर राणे यांनी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी यावल पोलीस स्टेशनमध्ये लिलाधर पाटील यांच्याविरुद्ध फ़िर्याद दाखल केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *