राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान…!

Social कट्टा यावल

शब्बीर खान >> सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. ही महामारी कमी व्हावी म्हणून महाराष्ट्रमध्ये सरकार तत्परतेने काम करत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे जाऊन समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ व सन्मान पत्र देउन सन्मानित करण्यात आले व ऋण व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या…!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्य अध्यक्ष रविद्र नाना पाटील यांच्या संकल्पना व मार्गशन खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी हिंगोणा प्राथमिक केंद्रा चे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ फीरोज तडवी , डॉ मुकेश सुफे ,घनश्याम डोळे ,अशोक तायडे, कैलास कोळी ,एस जे सोनवणे , वैशाली तळले, कामिनी किंगे, पूनम गावडे ,ज्योतीभावरे , आणि आशा वर्कर , व अंगणवाडी सेविका कर्मचारी यांचा सत्कार युवक राष्ट्रवादी यावल च्या वतीने करण्यात आला
राष्ट्रवादी युवक काँगेस चे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील उपजिल्ह्या अध्यक्ष गुणवंत निळं उपजिल्ह्याअध्यक्ष राज कोळी सरचिटणीस विनोद पाटील , सरचिटणीस प्रशांत पाटील , विध्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार , लीलाधर चौधरी , जितेंद्र निळं , सुभाष पाटील , शरीफ तडवी , हितेश गजरे , भिकन मराठे , सुनील इंगडे , शब्बीर खान , आदी करकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *