यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकीला ट्रकची धडक

अपघात क्राईम यावल साकळी

यावल प्रतिनिधी >>चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळ दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन छोटू धनगर (वय २१) रा. बोराजंटी, ता.चोपडा या तरुणाने येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्या नुसार तो सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी द्वारे चोपड्याकडून यावलकडे येत होता. तर यावलकडून चोपड्याकडे भरधाव वेगात ट्रक घेवून चालक जात होता.

वढोदा गावाजवळ ट्रक चालकाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचे सुमारे ५ हजारांचे नुकसान झाले. तर पवन धनगर यास कपाळावर, तोंडावर व डाव्या पायास मार लागून गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेवून पसार झाला आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार मेहबूब इमाम तडवी करत आहे.