यावल-चोपडा रस्त्यावर अपघात, चार जण जखमी

अपघात किनगाव क्राईम चोपडा यावल साकळी

यावल प्रतिनिधी >> चोपडा रस्त्यावर वन विभाग कार्यालयाजवळ दोन दुचाकींचा अपघात होवून ४ जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. जखमींवर यावल रुग्णालयात उपचार करून दोघांना जळगावला हलवण्यात आले.

गणेश भागवत माळी (वय ३९), मगन दौलत माळी (वय ६५, दोन्ही रा.किनगाव) हे दुचाकीने (एमएच.१९-बी.पी.३८३९) हे यावलला येत होते. त्यांच्या मागून दुचाकीने (एमएच.१९- ८८३८) जाकीर मुसा पटेल (वय ३८), त्यांच्या पत्नी अफशानबी जाकीर पटेल (वय ३२, रा.महेलखेडी) हे येत होते.

दरम्यान त्यांच्या समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागील दोन्ही दुचाकीचे नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यात दोन्ही दुचाकींवरील चौघे जखमी झाले. यावल येथील रफिक शेख, अॅड.रियाज पटेल, अशोक तायडे यांनी १०८ वाहनातून जखमींना प्रवीण बारी यांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार झाले. यापैकी जाकीर पटेल, अफशानबी पटेल यांना जळगावला हलवण्यात आले.