यावल ग्रामीण रुग्णालय

यावलच्या महिलेची तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या

आत्महत्या क्राईम तापी भुसावळ यावल

यावल>> शहरातील बोरावल गेट, डॉ.आंबेडकरनगर भागातील रहिवासी ६० वर्षीय महिलेने भुसावळातील तापी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सावित्रीबाई शंकर भालेराव असे मृत महिलेचे नाव आहे.

भालेराव यांनी शनिवारी सकाळी तापी नदीवरील पुल गाठला, तसेच थेट पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच नागरीकांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनेमागील कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली.