पोलीस आणि महसूल विभागाच्या साक्षीने भररस्त्यात पाण्याचे मोठे डबके.

यावल

नगरपरिषदे बाबत संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप.

यावल दि.4 ( सुरेश पाटील) यावल पोलीस तसेच यावल तहसील कार्यालयाच्या साक्षीने पोलीस स्टेशन कार्यालयाच्या समोर यावल नगरपरिषदेच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वरील व्हाल नादुरुस्त झाल्यामुळे भररस्त्यात पाण्याचे मोठे डबके होत असल्यामुळे पायदळ चालणाऱ्या व दुचाकी वाहनधारक नागरिकांमध्ये तालुक्यात मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


यावल पोलीस स्टेशन कार्यालय तसेच यावल तहसील कार्यालयाच्या समोर सातोद रस्त्यावर भररस्त्यात दररोज पाण्याचे मोठे डबके होत असल्याने यावल तहसील कार्यालयात, दुय्यम निबंधक कार्यालयात, जिल्हा परिषद पाणी पुरवठा कार्यालयात, स्टेट बँक, ग्रामीण रुग्णालय इत्यादी कार्यालयात दररोज तालुक्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना पायदळ चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यावल नगरपालिका मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभाग प्रमुख यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण यावल तालुक्यातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून यावल तहसीलदार आणि यावल पोलीस निरीक्षक यांनी यावल नगरपालिका मुख्याधिकारी यांना आदेश काढून पाईप लाईन वरील व्हाल तात्काळ दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही करावी. याकडे यावल शहरातील विविध राजकीय, सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *