यावल भाजपाचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन
यावल प्रतिनिधी ::>तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी भाजपने केली. यासाठी त्यांनी सोमवारी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन दिले. तसेच शेतशिवारात झालेल्या नुकसानीचे व्हिडीओ चित्रण देखील तहसीलदारांना दाखवले.
तालुक्यात संततधार पावसाने तालुक्यात सर्वत्र नुकसान झाले. तरीही आतापर्यंत पंचनामे झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी भाजपने केले. निवेदन देताना नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, गोपालसिंग पाटील, वैभव चौधरी, सुनील पाटील, पंकज महाजन, डिगंबर खडसे, निर्मल चोपडे, भूषण फेगडे, रितेश बारी आदी हजर होते.
पिकांची परिस्थिती बिकट : पावसामुळे ज्वारी काळी पडून त्यावर बुरशी आली आहे. कापसाचे बोंड काळे व लाल पडून कुजत आहेत. भुईमुगाच्या शेतात पाणी साचून शेंगा सडल्या आहेत. सोयाबीनच्या पिकावर शेंगांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने नुकसानीचे पंचनामे गरजेचे आहेत, असे नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी संगितले.