नागपुरच्या महिलेस अश्लिल मेसेज व व्हिडिओ पाठवणाऱ्या जळगावच्या तरुणास अटक

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> नागपूर येथील एका महिलेच्या मोबाइलवर अश्लिल मेसेज व व्हिडिओ पाठवणाऱ्या जळगावच्या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली.

नागपूर येथील जरीपटका या भागात राहणाऱ्या विवाहितेच्या व्हॉट‌्सॲपवर जळगाव येथील गौतम प्रकाश बाविस्कर (वय २८, रा. शांतीनगर, रामेश्वर कॉलनी) याने अश्लिल मेसेज व व्हिडिओ पाठवले होते.

या प्रकरणी नागपूर येथील जरीपटका पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित मोबाइल नंबरची तपासणी केली असता संशयित आरोपी हा जळगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार मोबाइल नंबरच्या आधारे तरुणास अटक करण्यात आली.