अश्लील हावभावाने मुलीची छेड काढत जाब विचारल्यावर केली मारहाण ; गुन्हा दाखल

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे ::> तालुक्यातील नेर येथे तरुणीला अश्लील इशारे करून तिचा विनयभंग करण्यात आला. पीडित तरुणीला तिच्या बहिणीसह मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याबाबत नेर गावातील १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार छतावर असताना नरेश भगवान शिरसाठ याने अश्लील हावभाव केले. त्यामुळे तरुणी संतप्त झाली. ती बहिणीसह नरेशला जाब विचारण्यासाठी गेली. त्यावेळी नरेश व त्याचा भाऊ लहू भगवान शिरसाठ यांनी दोघा बहिणींना शिवीगाळ, दामदाटी करत मारहाण केली. तसेच रस्त्यावर लोटून दिले.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, नरेश हा गेल्या काही दिवसांपासून सतत पाठलाग करत होता. तसेच अश्लील हातवारे करत होता, अशी तक्रारी पीडितेने दिली आहे. त्यावरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *