जळगाव प्रतिनिधी ::> इंदूर (मध्य प्रदेश) येथील माहेर व जळगावातील सासर असलेल्या एका विवाहितेस सासरच्या मंडळींनी १५ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ, मारहाण केली. या प्रकरणी इंदूर येथील महिला पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अन्नू आकाशदीप अरोरा (रा. आदित्यनगर, इंदूर) असे पीडितेचे नाव आहे. तिचे पती आकाशदीप अरोरा, सासू ज्योती अरोरा, सासरे कमलजितसिंह अरोरा (तिघे रा. जळगाव), नणंद जागृती टुटेजा व नणंदेचा पती सागर टुटेजा (रा. इंदूर) या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.