राष्ट्रवादीच्या मेळाव्यात व खडसेंच्या पक्ष प्रवेशाला हजेरी लावणारे अनेक कार्यकर्ते भाजपच्या अभ्यासवर्गात सहभागी

Politicalकट्टा कट्टा भुसावळ वरणगाव

वरणगाव प्रतिनिधी >> शहरात आयोजित भाजपच्या अभ्यासवर्गात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, संबंधित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या मुंबईतील पक्षप्रवेश सोहळ्याला वरणगाव परिसरातील भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पक्षप्रवेशानंतर खडसे यांचे वरणगावात आगमन झाले त्यावेळी हेच कार्यकर्ते स्वागताला उपस्थित होते. बाजार समितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मेळावा झाला, त्यावेळीदेखील हे कार्यकर्ते उपस्थित होते.

नागेश्वर महादेव मंदिरात नुकताच दोन दिवसीय भाजप अभ्यासवर्ग पार पडला. या अभ्यासवर्गाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात व खडसेंच्या पक्ष प्रवेशाला हजेरी लावणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.