कृषी कायद्यांच्या विरोधात वाकोद येथे रस्ता रोको आंदोलन

Politicalकट्टा आंदोलन कट्टा जामनेर

वाकोद ता.जामनेर >>केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात 8 डिसेंबर रोजी देशातील शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती.त्याला प्रतिसाद म्हणून राज्यातील शेतकरी संघटना तसेच महाविकास आघाडी सरकार मधील,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,प्रहार या घटक पक्षांच्या वतीनेही भारत बंद पाळला गेला.

वाकोद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी व सुशिक्षित तरुणांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून रास्ता रोको आंदोलन केले.तसेच हे अन्यायकारी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावे,दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांचे म्हणणे ऐकावे.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भास्कर पाटील,विलास जोशी,ओंकार आगळे,राजू कुमावत,रवींद्र(भैय्या)भगत,राजू शिरसाठ,उमेश भगत,गणेश पवार,प्रदीप देशमुख,अमोल जोशी,राजू लोहार,सागर जाधव,निलेश पाटील,निलेश जाधव,सुनील(मुन्ना)धामोडे, देविदास आगळे, तसेच अनेक शेतकरी,सुशिक्षित तरुण उपस्थित होते.यावेळी ऍड.ज्ञानेश्वर राऊत,सोपान गाढवे(पाटील) यांनी मनोगत व्यक्त केले.