चाळीसगाव : रेल्वेखाली आल्याने वडाळी येथील एका व्यक्तीचा मृत्यू

आत्महत्या क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी ::> रेल्वेखाली आल्याने तालुक्यातील वडाळा वडाळी येथील ४० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३) सकाळी ९.५५ वाजता वडाळा रेल्वे गेटजवळ खांब क्रमांक ३४० जवळ ही घटना घडली. सुकलाल पंडीत शेवरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार गणपत महिरे, गोवर्धन बोरसे हे करत आहेत.