यावल तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले

क्राईम पाेलिस यावल

वड्री ता. यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील वड्री येथून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्या प्रकरणी त्या मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात मुलीस पळवून नेणारा व त्यास मदत करणारा अशा दोघांचा समावेश आहे. ही मुलगी गेल्या बुधवारपासून बेपत्ता होती. तर या दोघांना शुक्रवारी यावल ताब्यात घेण्यात आले.

या मुलीस साहिल उर्फ दादू संजय भालेराव याने स्वयंदीप उर्फ नवल भालेराव याच्या मदतीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार येथील पोलिसांत गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी या तिघांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे.