भुसावळ प्रतिनिधी >> रेल्वे स्थानकावरील पीआरएस कार्यालय ते दर्गा दरम्यान १६ रोजी ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत महिलेची उंची ४.७ फूट, रंग निमगोरा, केस पांढरे-काळे, शरीर बांधा सडपातळ, अंगात लाल रंगाचे ब्लाऊज, पिवळसर रंगाच्या फुलांची साडी, जांभळ्या रंगाचे स्वेटर बिनबाहीचे असे वर्णन आहे. ओळख पटवावी, असे आवाहन लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार बबन शिंदे यांनी केले आहे.
