जळगाव ::> तीन वेळा तलाक शब्दाचा उच्चार करीत पत्नीस तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात शनिवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
इस्लामपुरा परिसरातील शाहिस्ताबी शेख सुलतान कुरेशी (वय २५) या आपल्या वडिलांकडे राहतात. त्यांचे गेंदालाल मिल परिसरातील सुरेशदादा जैननगरात राहणाऱ्या शेख सुलतान शेख लुकमान कुरेशी (वय ३०) यांच्यासोबत विवाह झाला आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेख सुलतान शेख कुरेशी यांनी पत्नीला शिवीगाळ करीत ‘आता मला तुझी गरज नाही, मी तुला आता आझाद करतो’असे म्हणत त्यांना तीन वेळा तलाक असा शब्द उच्चारून तोंडी तलाक दिला.
पतीने तोंडी तलाक दिल्यानंतर शाहिस्ताबी यांनी तत्काळ शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध तोंडी तलाक दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार शेख सुलतान याच्या विरुद्ध मुस्लिम महिला विवाहावरील हक्काचे संरक्षण कायदा २०१९ कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सलीम पिंजारी करीत आहे.