आजपासून या ठिकाणी सुरु होणार केशकर्तनालय

मुक्ताईनगर सिटी न्यूज

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी

मुक्ताईनगर :> कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडावूनमुळे मागील दोन महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद आहेत. काही अटी व शर्थीवर सलून दुकाने मुक्ताईनगरात आजपासून सुरू करण्यास तहसीलदारांनी परवानगी दिली आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या परिस्थितीत दुकान भाडे, लाईट बिल व कुटुंबाचा खर्च भागवणे सलून व्यावसायिकांना कठीण होत आहे. यामुळे सलून व्यावसायिकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याने सलुनची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन गुरुवारी शहरातील नाभिक समाज बांधवांनी आ.चंद्रकांत पाटील व तहसीलदार श्याम वाडकर यांना दिले.

यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार यांच्याशी याबाबत चर्चा केली. तालुका रेड झोन बाहेर असल्याने तूर्तास शासनाच्या गाईडलाइननुसार सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी तहसीलदार श्याम वाडकर यांनी चर्चेअंती दिली. यावेळी सोशल डिस्टिंग पाळत सॉनिटायझर व मास्क यासारख्या कोरोना संसर्गापासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना सलून दुकानांमध्ये अवलंबविण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी सलून व्यवसायिकांना करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *