जिल्ह्यातील जामनेर-मुक्ताईनगर परिसरात खरच आहे का वाघाचा संचार ?

जामनेर मुक्ताईनगर

सोशल मिडियावर प्रसारीत होत असलेला वाघाचा व्हिडिओ
जळगाव जिल्ह्यातील नाही – वन विभागाची माहिती

रिड जळगाव टीम >> मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वेल्हाळा राखेच्या बंडाजवळ व जामनेर तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील वनात वाघ या शीर्षकाखाली सोशल मीडियावर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ हा जळगाव जिल्हयातील नसून इतर क्षेत्रातील आहे, अशी माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी दिली आहे.

व्हायरल होत असलेला वाघाचा व्हिडीओ हा ९ सेकंदाचा असून त्यामध्ये वाघ मुक्तपणे वावरत असताना दिसून येत आहे. त्या व्हिडीओच्या अनुषंघाने वनविभागामार्फत संबंधित क्षेत्राची तपासणी केला असता या क्षेत्रात वाघ दिसून आला नाही.

तसेच व्हिडीओ हा जळगाव जिल्ह्यातील नसून इतर क्षेत्रातील असल्याने नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. तसेच वाघ वन्यप्राणी वावरतांना आढळून आल्यास तात्काळपणे वन विभागाच्या टोल फ्री नं. १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *