भुसावळात ऑनलाइन ओटीपी विचारून सव्वा तीन लाखांना चुना ; गुन्हा दाखल

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी :: फोनवर ओटीपी विचारून भामट्याने बँक खात्यातून तीन लाख २१ हजार रुपये ऑनलाइन लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील इंद्रायणी कॉलनीतील रहिवासी दिवाकर कान्हेकर यांना सोमवारी सायंकाळी अज्ञात संशयिताचा फोन आला होता. फोनवर संशयिताने आम्ही बॅँकेतून बोलत आहोत. तुमचा बॅकेचा खाते क्रमांक सांगा, तुमचे खाते अपडेट करायचे आाहे, असे सांगत ओटीपी क्रमांक विचारला. कान्हेकर यांनी ओटीपी क्रमांक दिल्याने त्यांच्या खात्यातून भामट्याने ३ लाख २१ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर कान्हेकर यांनी शहर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. त्यामुळे आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे पुढील तपास करत आहेत.