धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी युवक गंभीर जखमी, उपचारादरम्यान ओढवला मृत्यू

आत्महत्या क्राईम भुसावळ

भुसावळ >> धावत्या रेल्वेतून ३४ वर्षीय अनोळखी युवक पडल्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली होती. वरणगाव-मन्यारखेडा रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक ५२ जवळी हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान १६ रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. अनोळखी मृताची उंची पाच फूट सहा इंच, रंग गोरा, नाक सरळ, मिशी जाड, दाढी ठेवलेली, अंगात शर्ट नाही तसेच फिक्कट रंगाची जीन्स असे वर्णन आहे. ओळख पटवावी, असे आवाहन लोहमार्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके यांनी केले आहे.