बेपत्ता झालेल्या तरुणाचा शेतातील विहिरीत आढळला मृतदेह

अपघात आत्महत्या क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे::> तालुक्यातील हेंद्रूण गावातून बेपत्ता झालेल्या संजय एंडाईत या तरुणाचा मृतदेह गुरुवारी शेतविहिरीत आढळला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.हेंद्रूण येथील संजय नथ्थू एंडाईत हे बुधवारी राहत्या घरातून बेपत्ता झाले होते.

नैसर्गिक विधीला जात असल्याचे कारण सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर गाव शिवारातील विठ्ठल राजपूत यांच्या शेताजवळ त्यांची चप्पल आढळली होती.त्यानंतर त्याचा या ठिकाणी असलेल्या विहिरीत शोध सुरू झाला.

या विहिरीत सुमारे ऐंशी फुटांपर्यंत पाणी असलेल्या या विहिरीत त्यांचा शोध सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत ते आढळले नाही. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळला.

याप्रकरणी त्यांचे भाऊ बापू नथ्थू एंडाईत यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.